Kokum juice | कोकम सरबत पिताय ? तर हा व्हिडिओ नक्की पहा | Summer Season | Sakal Media
ऊन जरा जास्तच आहे.. कवी सौमित्रनं लिहिलेली ही ओळ यावर्षीही तंतोतंत लागू होतेय.
होळी झाली की उकाडा वाढतो, असं म्हणतात. तसंच सध्या तापमानाचा पाराही वाढायला लागलाय. सूर्य जसा डोक्यावर यायला लागतो तशी अंगाची लाहीलाही होते. उन्हाचे चटकेही बसायला लागतात. अशातच तहानही लागते. त्यात गारवा हवा म्हणून आपण कोल्ड्रिंककडे वळतो. पण आता मी तुम्हाला घरच्या घरी करता येणाऱ्या थंडगार पेयाबद्दल सांगणार आहे ते म्हणजे कोकम सरबत.